वादळाने खंडित झालेला सावर्डे परिसरातील साडेतेरा हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत


रत्नागिरी, दि. २३  : सावर्डे उपविभागातील एकूण 25,500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण 13 हजार 500 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. सावर्डा, निवळी, कोकरे, डेरवण, कुडप, हडकणी, असुर्डे खेरशेत गावातील काही ग्राहक पोल पडल्यामुळे अंधारात आहेत. उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील असल्याची माहिती महावितराणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुले-देसाई यांनी दिली.


सावर्डा उपविभागामध्ये सावर्डे व डेरवण भागात काल दिनांक 22 मेरोजी दुपारी अंदाजे तीन वाजता प्रचंड वारा वादळ व पाऊस झाल्यामुळे खूप मोठी झाडे पडली होती. त्या झाडांमुळे महावितरणच्या यंत्रणेची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. यामध्ये तेथे 33 के व्ही उच्चदाब वाहिनीचे 7 पोल, 11 के व्ही उच्चदाब वाहिनीचे 28 पोल व लघुदाब वाहिनेचे 54 पोल असे एकूण 100 पोल पडले. तसेच बऱ्याच ठिकाणी लघुदाब वाहिनी व उच्चदाब वाहिनीच्या तारा तुटल्या आहेत.

या वादळामुळे महावितरणचे एकूण अंदाजे रू. 38 लाख चे नुकसान झालेले आहे.
हे पोल पडल्यामुळे सावर्डे उपविभागातील एकूण 25 हजार 500 ग्राहकांचा वीज पुरवठा बंद होता. वादळ व पाऊस थांबल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम त्वरित सुरू करण्यात आले. कालच रात्री सुमारे दोन वाजेपर्यंत एकूण 13 हजार 500 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला. तसेच आज या कामासाठी एकूण 7 अभियंता अधिकारी, 55 कर्मचारी तसेच 45 ठेकेदाराची माणसे काम करत होती. आज उच्च दाब तसेच लघुदाब वहिनीचे पोलचे काम झाल्यामुळे एकूण 10 हजार ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येईल. एकूण 23 हजार 500 ग्राहकांचा विज पुरवठा सुरळीत करण्यात येईल. सावर्डा निवळी कोकरे डेरवण कुडप हडकणी असुर्डे खेरशेत गावातील काही ग्राहक पोल पडल्यामुळे अंधारात आहेत. उर्वरित काम हे लवकरात लवकर पूर्ण करण्यास महावितरण प्रयत्नशील आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE