- राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेचे रेल्वेला निवेदन
शेगाव : शेगाव रेल्वे स्टेशन येथे गुड॒स शेड (मालधक्का) आणि पार्सल सुविधा सुरू करण्यात यावी, या संदर्भातील निवेदन राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या वतीने भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षांना शेगाव रेल्वे स्थानकामार्फत पाठवण्यात आले.
शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांच्या माध्यमातून रेल्वे बोर्डाला हे निवेदन पाठविण्यात आले. मोहन देशपांडे यांना हे निवेदन देताना राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या महिला पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

राष्ट्रीय महिला प्रवासी संघटनेच्या शेगाव स्थानकासंदर्भातील या मागणीचा सकारात्मक विचार करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली आहे.
