पोस्टल विभागाकडून २९ व ३० मे रोजी विशेष आधार व्यवहार मोहीम

रत्नागिरी, दि. २४ : रत्नागिरी पोस्टल विभागाकडून दिनांक 29 व 30 मे रोजी आधार केंद्र कार्यालयांमध्ये विशेष आधार व्यवहार मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी दिली.

रत्नागिरी पोस्ट विभागाकडून जिल्ह्यातील नागरिकांसाठी मुख्यालय, रामपूर, लांजा, राजापूर, पोफळी, संगमेश्वर, दापोली, लवेल, दाभोळ, निवळी (चिपळूण), चिपळूण मुख्यालय, माखजन, शिरळ, वाकवली, मालगुंड, पावस, ओणी, सावर्डा, जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी आधार नोंदणी व अद्ययतन याचे सध्या काम चालू आहे.
१० वी आणि १२ वी च्या विद्यार्थ्यासाठी बोर्डाचा परीक्षा फॉर्म भरत असताना विद्यार्थ्याचे आधार कार्ड अद्ययावत करणे गरजेचे असते. परीक्षा फॉर्म भरत असताना भविष्यात अडचणी येवू नयेत यासाठी विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड अगोदरच अद्ययावत करणे गरजेचे असते. सबंधित आधार केंद्रांच्या परिसरातील सर्व १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा. शाळेत विशेष आधार शिबीर लावण्यासाठी ०२३५२-२२००५५ वर संपर्क करावा.

आधार केंद्र मध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधारकार्ड वरील फोटो/जन्मतारीख/पत्ता बदलणे, लग्नानंतरचे नाव बदलणे, हाताचे ठसे (बायोमेट्रिक) अपडेट करणे, आधारला मोबाईल लिंक करणे इ.सुविधांचा लाभ ग्राहकांना या शिबिरातून मिळणार आहे.

शाळेत विशेष आधार कॅम्प लावण्यासाठी दुरध्वनी क्रमाक ०२३५२-२२००५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.असे आवाहन रत्नागिरी डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE