लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे जल्लोष

  • पेढे वाटून, फटाके वाजवून केला आनंदोत्सव साजरा

उरण दि. ५ (विठ्ठल ममताबादे ) :  लोकसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या सामन्यात कोण विजयी होणार, याकडे देशासह राज्यातील जनतेसह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निकालानंतर उरण शहर व तालुका काँग्रेसतर्फे निवडणुकीतील विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.

या सामन्यात अखेर विरोधकांच्या महाविकास आघाडीने सत्ताधारी पक्षांच्या महायुतीवर वर्चस्व मिळवले. महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या, तर महायुतीला १७ जागावर समाधान मानावे लागले. एक जागा अपक्षाच्या वाट्याला गेली. काँग्रेसला या निकालाने नवसंजीवनी दिली असून, सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील पराभवानंतर या पक्षाने घवघवीत यश मिळविले. २०१९ मध्ये केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने १३ जागा जिंकत राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान अधोरेखित केले आहे.

तसेच लोकसभेच्या भारतातील विविध ठिकाणी झालेल्या राज्यात इंडिया आघाडीचे अनेक उमेदवार मोठया प्रमाणात निवडून आले. व भाजपाला बहुमतापासून दूर ठेवले.ही एका अर्थाने सत्ता परिवर्तनाची ही वाटचाल आहे. काँग्रेस व काँग्रेसच्या सहयोगी मित्र पक्षाचे उमेदवार, इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आल्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडीमुळे खूप मोठे बदल होईल व महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका इंडिया आघाडी जिंकून सत्ता प्राप्त करेल. भाजपचे अनेक उमेदवार पडल्याने व बहुमत न गाठल्याने निवडणुकीत भाजपचा एका अर्थाने हा पराभवच झाला आहे.हा नैतिकतेचा पराभव झाला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी उरण येथे केली आहे.

२०२४ च्या लोकसभेत इंडिया आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आल्याने तसेच भाजपाला बहुमतापासून दूर ठेवल्याने इंडिया आघाडीच्या सर्वच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात जल्लोष साजरा केला आहे.तसेच महाराष्ट्रात इंडिया आघाडीला सर्वाधिक जागा म्हणजेच ३० जागा मिळाल्याने या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षातर्फे उरण शहरातील गणपती चौक येथे असलेल्या काँग्रेस कार्यालयात व कार्यालयाबाहेर पेढे वाटून,एकमेकांना शुभेच्छा देऊन, काँग्रेस पक्षाचा विजय असो असे नारे देत काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.

यावेळी कामगार नेते तथा काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सर्वांना शुभेच्छा देत पदाधिकारी कार्यकर्त्यांना पेढे भरवून विजयाचा आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील, इंटक जिल्हा सरचिटणीस सुजित पाटील, रायगड जिल्हा सेवादल कार्याध्यक्ष वैभव ठाकूर, सेवादल अध्यक्ष कमळाकर घरत, पनवेल जिल्हा ओबीसी अध्यक्ष वैभव पाटील, उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे,शहराध्यक्ष प्रकाश पाटील, जेष्ठ नेते अशोक ठाकूर, महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत,उरण तालुका उपाध्यक्ष आश्रया शिवकर, उपाध्यक्ष निर्मला पाटील, अमिता पटेल सरचिटणीस उरण शहर, शहर उपाध्यक्ष जितेश म्हात्रे,जेष्ठ कार्यकर्ते जे.डी. पाटील,इंटक अध्यक्ष संजय ठाकूर, सेवादल शहर अध्यक्ष शैलेश तामगाडगे, जासई ग्रामपंचायतचे सदस्य आदित्य घरत, जेष्ठ कार्यकर्ते जयवंत पाटील, हेमंत ठाकूर, जासई अध्यक्ष रमेश पाटील, केगाव उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, बोकडविरा ग्रामपंचायतचे उपसरपंच धुव पाटील,गुफरान तुंगेकर, लंकेश ठाकूर,रमेश टेमकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE