नरेंद्र मोदींनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ!

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी (दि.९) सायंकाळी राष्‍ट्रपती भवनात पार पडला. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह ७१ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र माेदी हे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत.

शुक्रवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नरेंद्र मोदींना सरकार स्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर रविवारी नरेंद्र मोदींचा शपथविधी पार पडला. पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करून आजच्या दिवसाची सुरुवात केली. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनाही त्यांनी आदरांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर जाऊन पुष्पहार अर्पण केला.

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला शेजारील देशातील अनेक नेते उपस्थित आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यानंतर कॅबिनेट मंत्रीपदी राजनाथ सिंह आणि अमित शहा यांनी शपथ घेतली. त्यानंतर जे. पी. नड्डा यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह आणि अमित शहा यांच्‍यानंतर नितीन गडकरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर शिवराजसिंह चौहान यांनी शपथ घेतली.

नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्ममधील कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील खासदारांनादेखील संधी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तसेच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले खासदार पीयूष गोयल यांनादेखील मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे.

पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री पुढीलप्रमाणे : राजनाथ सिंह, अमित शाह, नितिन गडकरी, जेपी नड्डा, शिवराज सिंह चौहान, निर्मला सीतारमण, सुब्रह्मण्यम जयशंकर, मनोहर लाल, हरदनहल्ली देवगौड़ा कुमारस्वामी, पीयूष गोयल, धर्मेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंह, सर्बानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्र कुमार, राममोहन नायडू, प्रल्हाद जोशी, जुएल ओरांव, गिरिराज सिंह, अश्वनी वैष्णव, ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया, भूपेंद्र यादव, गजेन्द्र सिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीप सिंह पुरी, डॉ मनसुख मंडाविया, जी किशन रेड्डी, चिराग पासवान, सीआर पाटील, राव इंद्रजीत सिंह.

पंतप्रधान मोदींच्या  मंत्रिमंडळातील राज्यमंत्री पुढीलप्रमाणे : जितेंद्र सिंह, अर्जुन राम मेघवल, प्रतापराव जाधव, जयंत चौधरी, जितिन प्रसाद, श्रीपाद यशो नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकुर, नित्यानंद राय, अनुप्रिया पटेल, वी सोमन्ना, चंद्रशेखर पेम्मासानी, एसपी सिंह बघेल,शोभा करांदलाजे, कीर्तिवर्धन सिंह, बनवारी लाल वर्मा, शांतनु ठाकुर, सुरेश गोपी, एल मुरुगन, अजय तमटा, बंडी संजय कुमार, कमलेश पासवान, भागीरथ चौधरी, सतीशचंद्र दुबे, संजय सेठ, रावनीत सिंह बिट्टू, दुर्गादास उइके, रक्षा निखिल खडसे, सुकांता मजूमदार, सावित्री ठाकुर, तोखन साहू, डॉ राजभूषण निषाद, भूपतिराजू श्रीनिवास वर्मा, हर्ष मल्होत्रा, निमुबेन जयंतीभाई बांभानिया, मुरलीधर मोहोळ, जॉर्ज कुरियन.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE