- लांजा तालुक्यातील कोर्ले येथील घटना
लांजा : लांजा तालुक्यातील कोर्ले येथे एका विहिरीत अडकलेल्या खवले मांजराला जीवदान देण्यात वन विभागाला यश आले आहे. वन विभागाने या खवले मांजराला सुरक्षित विहिरीबाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.

लांजा तालुक्यातील कोर्ले येथील शेतकरी सुधाकर गोपाळ कांबळे कांबळे यांच्या काजू बागेच्या विहिरीत खवले मांजर असल्याचे बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या आढळून आले. श्री कांबळे यांनी लांजा वन विभागाला माहिती दिली तातडीने लांजा वनाधिकारी दिलीप आरेकर आणि वनरक्षक कांबळे श्री. प्र. पवार आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी घटनास्थळी जाऊन विहिरीत पडलेल्या खवले मांजरला सायंकाळी उशिरा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. पशु वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत तपासणी करून या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
- हे देखील वाचा : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग धामणी येथे खचण्याची भीती
- दिल्ली आकाशवाणीकडून रत्नागिरीच्या अवधूत बाम यांना ‘टॉप ग्रेड’ प्रदान
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही उपलब्ध
वन विभागाचे अधिकारी रत्नागिरीच्या गिरीजा देसाई, सहायक वनरक्षक श्री. बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा वनपाल श्री. दिलीप आरेकर वनरक्षक सौ. कांबळे श्री. पवार आणि वनमित्र अमित लांजेकर यांनी खवले मांजराच्या बचाव मोहिमेत यशस्वी कामगिरी केली.
