दरड कोसळल्याने कोकण-राजापूर जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटातील वाहतूक विस्कळीत

राजापूर : कोकणला कोल्हापूरशी जोडणारा अणुस्कुरा घाट पावसामुळे दरड कोसळल्याने ती हटवेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे कोकणला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसामुळे घाटातील दरड मार्गावर कोसळली आहे.

या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीने ही दरड बाजूला हटवण्याचे काम सुरु आहे.

मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील घटनास्थळी मागवण्यात आले आहे. ही दरड हटवल्यानंतर या मार्गावरुन होणारी वाहतूक सुरु केली जाईल. तोपर्यंत आज रात्री अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE