शिवरायांचा स्वराज्यासाठीचा संघर्ष पुढच्या पिढीपर्यंत जाण्यासाठी हे सोहळे महत्त्वाचे : नीलेश राणे

  • मारुती मंदिर येथे ३५१ वा शिवराज्यभिषेक सोहळा उत्साहात साजरा
  • श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान,रत्नागिरीचे आयोजन

रत्नागिरी : संघर्ष, लढाऊ वृत्ती यातूनच स्वराज्य स्थापन होते याची शिकवण ३५१ वर्षांपूर्वी याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजंनी दिली आहे, हा इतिहास असाच पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्यासाठी असे सोहळे महत्वाचे असतात असे प्रतिपादन भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी केले.

मुघलशाही, निजामशाहीचे तख्त नेस्तनाबूत करुन हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच ३५१ व शिवराज्यभिषेक सोहळा मोठा उत्साहात रत्नागिरीतील मारुती मंदिर येथील आश्वारूढ पुतळ्याजवळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने साजरा झाला. यावेळी राजांच्या अश्वारूढ आणि सिंहासनाधिष्टीत मूर्तीला दुग्ध अभिषेक करून साखर,पेढे वाटून हा सोहळा साजरा झालं. यावेळी शिवप्रेमी भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला. महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक केला. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले

शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादाई आहे. तो अनेक पिढ्यांना कळावा, या इतिहासातून उत्तम ते आत्मसात करावं, महाराजांनी या स्वराज्यासाठी केलेल्या संघर्षाचे जाणीव ठेवावी यासाठी आजचा हा शिवराज्याभिषेकाचा सोहळा आहे. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी महाराजांनी अनेक कष्ट हाल अपेक्षा सोसल्या आणि रयतेचं राज्य, स्वराज्य स्थापन केलं. त्यासाठी त्यानं संघर्ष करावा लागला, कष्ट घ्यावे लागले, अनेक मावळ्यांनी या स्वराज्यासाठी बलिदान केलं तेव्हाच आज 351 शिवराज्याभिषेक सोहळा आपण साजरा करतोय. पण हा साजरा करण्यापुरता दिवस मर्यादित ठेवू नका महाराजांनी स्वराज्य का स्थापन केलं हा विचार आपल्या मनातून जाता कामा नये असे निलेश राणे म्हणाले. रत्नागिरीमध्ये शिवरायांचा कार्यक्रम असतो तेव्हा मोठ्या प्रमाणात तरुण पिढी बाहेर पडते, असे अनेक कार्यक्रम मी पाहिलेत आणि ही आनंदाची गोष्ट आहे असही निलेश राणे म्हणाले,

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री मिलिंद तगारे यानी श्री शिवछत्रपतिंच्या मुर्तीला पुष्पहार अर्पण करुण उपस्थितांना मार्गदर्शन केले.
आजच्या शिवराज्याभिषेक दिनाचे मानकरी श्री व सौ राणे दांपत्याच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मुर्तीची विधिवत पूजा करून अभिषेक करण्यात आला.

यावेळी हिंदुत्ववादी प्रेमी राकेश नलावडे, जयदीप साळवी, नंदू चव्हाण, कौस्तुभ सावंत, अमित काटे, अक्षत सावंत, निखिल सावंत, ऋषिकेश शिंदे, अमित नाईक, अमेय पाडावे यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, शिवप्रेमी उपस्थित होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE