Good News | कोकणच्या निसर्गसंपदेसाठी शुभ संकेत !! लांजातील भांबेडमध्ये आढळले दुर्मिळ शेकरू!

लांजा :  लांजा तालुक्यातील भांबेड येथील मुंबई स्थित भाजप जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या श्री. नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशु शेकरू या अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे दर्शन झाले आहे. शेकरू म्हणजेच उडती खार या दुर्मिळ प्राण्याचे झाडांवर बागडतानाचे दृश्य श्री. नवल शेवाळे यांनी टिपले आहे.


वन पर्यावरण आणि प्राणी प्रेमींसाठी ही एक सुखद बातमी आहे. लांजा वनपाल श्री. दिलीप आरेकर यांनी चित्रित केलेल्या चित्रफितीत दिसणाराहा प्राणी शेकरू असल्याचे सांगितले. शेकरू हा महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे. उडती खार ही खारीची प्रजात आहे.


शेकरू (उडती खार; शास्त्रीय नाव: Ratufa indica, रॅटुफा इंडिका ; इंग्लिश: Indian giant squirrel, इंडियन जायंट स्क्विरल) ही खारींची एक प्रजाती आहे. शेकरू महाराष्ट्र राज्याचा राज्यपशू आहे. शेकरू हा पशु भीमाशंकर या भागात जास्त प्रमाणात आढळून येतो. भांबेड येथील नवल शेवाळे हे मुंबई त नोकरीनिमित्त स्थायिक आहे मुळगाव भांबेड मुंबई येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत त्यांनी काजू आणि आंबा  बाग जोपासली आहे. लांजा पूर्व विभाग सह्याद्रीच्या पायथ्याशी येतो पूर्व भागात खोरनिणको, प्रभानवल्ली, भांबेड या गावात जंगल वनसंपदा मोठ्या प्रमाणात आहे. पूर्वी आंबा घाटात जंगल परिसरात शेकरू हा प्राणी आढळत असे. भीमाशंकर पर्वत भागात शेकरूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे परंतु हळूहळू हा प्राणी प्रजनन कमी होत गेल्याने याचे दर्शन दुर्मिळ झाले आहे.

राज्य पशु शेकरूचा भांबेड येथील बागेत बागडतानाचा व्हिडिओ अवश्य पहा 

मी दोन दिवसापूर्वी मुंबई येथून भांबेड गावी आलो होतो. बागेत गेल्यानंतर मी एक वेगळा प्राणी एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत असल्याचे पाहिले. सुरुवातीला माकडासारखा असणारा प्राणी कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले.

– नवल शेवाळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष.

 

नवल शेवाळे यांनी सांगितले की, मी दोन दिवसापूर्वी मुंबई येथून भांबेड गावी आलो होतो बागेत गेल्यानंतर मला एक वेगळा प्राणी एका झाडावर दुसऱ्या झाडावर उड्या मारत असल्याचे पाहिले सुरुवातीला माकडा सारखा असणारा प्राणी कुतूहल वाढून त्याला कॅमेऱ्यात कैद केले नवल शेवाळे यांनी चित्रीत केलेला ही चित्रफित भांबेड गावचे सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण हेगिष्टये यांनी वनाधिकारी यांना खात्री करण्यास सांगितले नवल शेवाळे यांनी वन अधिकाऱ्यांशी संपर्क करून हा प्राणी शेकरू असल्याचे खात्री केली. लांजा तालुक्यात शेकरू आढळल्याने एक वन पर्यावरणाची सुखद आणि दिलासा देणारी घटना आहे. वनसंपदा आपण जोपासली पाहिजे, असेही भाजप जिल्हा उपाध्यक्ष नवल शेवाळे यांनी सांगितले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE