चिपळूणच्या चिंचनाक्यात भर रस्त्यावर अवतरली महाकाय मगर!

चिपळूण : चिपळूण शहरातील चिंचनाका भागातील भर रस्त्यावर रविवारी मध्यरात्रीनंतर एक भली मोठी मगर मुक्तपणे फिरताना आढळली.

चिपळूण आणि चिपळूणवासियांना मगर हा विषय नवीन नसला तरी शहरात सध्या पुरासारखी स्थिती नसतानाही भर रस्त्यात एक भली मोठी मगर मनसोक्तपणे फिरताना दिसल्याने नागरिकांची पाचावर धारण बसली. अशाही स्थितीत रिक्षाचालकांसह काही वाहनचालकांनी रस्त्यावर वावरणाऱ्या मगरीला आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात बंदिस्त केले. त्यानंतर तातडीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यावर तो चांगलाच व्हायरल झाला.

पावसाळा सुरू झाला असला तरी चिपळूण शहरात सध्या पुरासारखी परिस्थिती नसताना देखील अचानक भर रस्त्यात मगर अवतरली. रस्त्यावर फिरणारी मगर पाहताच काही नागरिकांनी वन खात्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE