कृषिवृंद गटातर्फे कासे येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

  • गोविंदराव निकम महाविद्यालयातील कृषिदुतांचा उपक्रम

माखजन : संगमेश्वर तालुक्यातील माखजननजीक कासे येथे सावर्डे येथील गोविंदराव निकम कृषी महाविद्यालयातील कृषीवृंद गटातील कृषिदूतानी शेतकरी वर्गाला मार्गदर्शन केले.

यावेळी कृषिदूतांनी शेतकऱ्यांना उपद्रवी ठरणारी माकडे तसेच वानर यांना पळवून लावण्यासाठी तयार केलेली कमी खर्चातील बंदूक लक्षवेधी ठरली. कासे, कळंबुशी, माखजन, पेढांबे,असावे व आजुबाजूच्या गावात वानर व माकडांचा मोठा त्रास असतो. यावर ही बंदूक शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरत आहे. कृषिदुतांनी नेहमीच्या प्रात्यक्षिकाखेरीज वेगळं आणि उपयोगी प्रात्यक्षिक दाखवल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

कृषीदुतांकडून ग्रामपंचायत कार्यालय आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात कृषिदुतांकडून ग्रामस्थांना भात शेतीविषयी विविध प्रकारची माहिती देण्यात आली व भात शेतीमधील विविध किडी व तण नियंत्रण कसे करावे, यासाठी मार्गदर्शन केले.

यावेळी सौरभ गरुड, यश जाधव, अथर्व गावडे, महेश पाटील, शुभम पाटील, विश्वजित जाधव, प्रणव जांभळे, शुभम गायकवाड, राजवर्धन पाटील, रुझान मुलाणी,ओंकार बोधगिर, शंतनू पवार आदी कृषिदूत उपस्थित होते. सरपंच जगन्नाथ राऊत, उपसरपंच जनार्दन कातकर, दिलीप जोशी, दत्ताराम भुवड, रुपेश गोताड, रमेश कातकर, उदय भुवड तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नंदकुमार जडयार उपस्थित होते. आणि कृषिदूतानी कृषीदिनी शेतकऱ्यांना शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE