Konkan Railway | झाड कोसळल्याने कोकण रेल्वेच्या वाहतुकीला ‘ब्रेक’

दिल्लीच्या दिशेने धावणारी मंगला एक्सप्रेस सुमारे सहा तास लेट ; नेत्रावती एक्सप्रेसलाही झाला पाच तास उशीर ; अन्य काही गाड्यांवर परिणाम

पणजी : कोकण रेल्वे मार्गावर करमाळी ते वेर्णा सेक्शनमध्ये सोमवारी पहाटेच्या सुमारास ओव्हरहेड विद्युत वाहिनीवर (OHE) पावसामुळे झाड कोसळून पडल्यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास मार्गावरील अडथळा दूर केल्यानंतर खोळंबलेली वाहतूक सुरू झाली आहे.

ओव्हरहेड वायरवर झाड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच्या स्थितीनुसार कुडाळ ते कारवार दरम्यान खोळंबा झालेल्या गाड्या.

मागील दोन-तीन दिवसांपासून संपूर्ण कोकण किनारपट्टीत मुसळधार पाऊस सुरू आहे. यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कोल्हापूर जिल्ह्यात तर हवामान खात्याने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुसळधार पाऊस सुरू असतानाच कोकण रेल्वे मार्गावर वेर्णा ते करमाळी दरम्यान रेल्वे गाड्यांना विद्युत पुरवठा करणाऱ्या ओव्हरहेड वायरवर झाड कोसळून पडल्यामुळे सोमवारी पहाटेपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.

या घटनेमुळे अप दिशेने धावणारी नेत्रावती तसेच एरनाकुलम येथून दिल्लीला जाणारी मंगला एक्सप्रेस सुमारे पाच ते सहा तीन उशिराने धावत होत्या. कोकण रेल्वे मार्ग धावणाऱ्या अन्य काही गाड्यांच्या वेळापत्रकावरही यामुळे परिणाम झाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE