चिपळूण : गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाच्या अंतर्गत ग्रामीण कृषी कार्यानुभव साठी नांदगावमधील कृषीरत्न या संघाकडून चारसुत्री या भात लागवड प्रकारचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्यात आले.
योग्य नियोजन व व्यवस्थापन करून पिकाचे उत्पादन कसे वाढवता येईल हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. या प्रकारात दोन रोपांच्या मध्ये 15×25 येवढे अंतर घेऊन लावणी करण्यात आली. गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक विघ्नेश सकपाळ यांनी देखील या वेळी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
