Konkan Railway | रत्नागिरी, पनवेल मार्गे आज धावणाऱ्या चंदीगड स्पेशल ट्रेनची शेकडो तिकिटे उपलब्ध!

  • मडगाव ते चंदिगड वन-वे स्पेशल आज सकाळी नऊ वाजता मडगाव येथून सुटणार !
  • वातानुकूलित, स्लीपरसह जनरल डब्यांचाही समावे

रत्नागिरी : मडगाव ते चंदीगड अशी वन-वे स्पेशल ट्रेन आज दि. 12 जुलै 2024 रोजी सकाळी ९ वाजता सुटणार आहे. रत्नागिरी, रोहा, पनवेल, वसई रोड मार्गे ही गाडी चंडीगडपर्यंत धावणार आहे. ही गाडी रत्नागिरी स्थानकावर दुपारी २ वाजून १० मिनिटांनी येईल आणि पनवेलला ती आजच (शुक्रवारी) सायंकाळी ७.३० वाजता तर वसईला ती रात्री ८ वाजून २० मिनिटांनी पोहचलणार आहे. या विशेष ट्रेबचं आरक्षण खुले झाले असून शेकडो तिकिटे उपलब्ध आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वे दिलेल्या माहितीनुसार मडगाव जंक्शन ते चंदीगड ही वनवे स्पेशल ट्रेन (02449) दिनांक 12 जुलै 2024 रोजी सकाळी नऊ वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल आणि चंदीगडला ती शनिवारी सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी पोहोचेल.

एकदिशा वनवे स्पेशलचे थांबे

करमळी, थिवी, पेडणे, रत्नागिरी, रोहा पनवेल, वसई रोड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, हजरत निजामुद्दीन, नवी दिल्ली, पानिपत आणि अंबाला कॅन्ट.

ही वनवे स्पेशल गाडी 22 डब्यांची एलएचबी श्रेणीतील धावणार आहे. यामध्ये वातानुकलीत श्रेणीसह स्लीपर व जनरल डब्यांचा ही समावेश आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE