राजापूर : अखेर मौजे वाटूळ तालुका राजापूर येथे १०० खाटांचे सुपर मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालय मंजूर झाल्याचा निर्णय आज राज्य शासनाने घेतला असून सदर रुग्णालय विशेष बाब म्हणून मंजूर झाल्याचा आदेश म्हणून पारित करण्यात आला आहे.

नुकतेच रत्नागिरीचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी कोकण विभागासाठी वाटूळ येथे प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. लांजा राजापूर संगमेश्वर विधानसभा आमदार डॉ. राजन साळवी यांनीही वाटुळ येथे स्पेशालिस्ट रुग्णालय व्हावे, यासाठी पाठपुरावा केला होता. राजापूर तालुका संघर्ष समितीने या रुग्णालयासंदर्भात जनजागृती केली होती.
