काजळी नदीला आलेल्या पुरामुळे आंजणारीतील मंदिराला पाण्याचा वेढा

लांजा : लांजा तालुक्यातील जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे लांजातील काजळी नदीला आलेल्या पुराने नदीकाठच्या आंजणारी मंदिर श्री क्षेत्र अवधूतवन स्वयंभू दत्तस्थान मठमंदिराला पाण्याचा वेढा पडला असून आज रविवारी गुरुपौर्णिमेनिमित्त होणारे सर्व धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

आज रविवारी दिनांक.21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमानिमित्त धार्मिक कार्यक्रम रद्द झाल्याचे मंदिर ट्रस्टचे सुभाष पवार यांनी सांगितले. लांजा तालुक्यात सकाळपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत आहे. जोरदार पावसाने झोडपले आहे. काजलि, मुचुकुंदी नदीला पुर आला आहे.

रत्नागिरी पाटबंधारे पूर नियत्रंण कक्ष याच्या अहवालानुसार सकाळी ८ वाजता दिलेल्या नदी पाणी पातळी मापननुसार काजलीं नदी सध्याची पातळी 16.50 आहे. लांजा. आंजणारी पूल ल येथून ही पुराची पाणी पातळी मापन आहे. इशारा पातळी 16.50 आहे धोका पातळी 18.50 आहे. पाऊस सुरू झाल्यापासून आंजणारी पुल पुराने केवळ 17.100 पाणी पातळी वाढली होती. आंजणारी पूल हा ब्रिटिशकालीन पुल आहे. 100 वर्ष झाल्याने हा पूल वाहतुकीस धोकादायक स्थितीत आहे. इशारा पातळी ओलांडल्यानंतर या पुलावरील वाहतूक बंद करण्यात येते आंजणारीजवळील मठ दतमंदीरला पुराच्या पाण्यात वेढा घातला असल्याने भाविकांनी दर्शनासाठी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE