- युवा तायक्वांदोच्या खेळाडूंनी पाच सुवर्णसह नऊ कांस्य पदकांवर कोरले नाव !
रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने दि. १९ ते २१ जुलै २०२४ या कालावधीत चंद्रपूर येथे झालेल्या राज्यस्तरीय कॅडेट तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघाचा सहभाग होता. या स्पर्धेत रत्नागिरीच्या युवा तायक्वांदोच्या खेळाडूंनी तब्बल १४ पदके मिळवली.
या संघात जिल्हा संघटनेला अधिकृत मान्यता असलेली तालुक्यातील युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप ओम साई मित्र मंडळ येथे सुरु असलेल्या तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील स्वरा हर्षल तेरवणकर- सुवर्ण पदक, नीलाक्षी राजेश राहटे -सुवर्ण पदक, वेदांत संतोष देसाई -सुवर्ण पदक, नूपूर नीलेश दप्तरदार-सुवर्ण पदक तसेच योगराज सत्यविजय पवार याने या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले.
वरील सुवर्णपदकांबरोबरच या स्पर्धेत नुपूर नीलेश दप्तरदार -कास्य, उपर्जना राम कररा- कास्य, रुद्धी मधुर धुळप- कास्य, भार्गवी सत्यविजय पवार-कास्य,
अर्णव हेमराज निर्मल- कास्य, योगराज सत्यविजय पवार -कास्य, वेदांत संतोष देसाई -कास्य, योगराज एस. पवार- कास्य, भार्गवी सत्यविजय पवार -कास्य पदक याप्रमाणे युवा रत्नागिरीच्या तायक्वांदो पटूनी यश संपादन केले.
या खेळाडूंनी राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करत पूमसे प्रकारात प्रथम क्रमांक तर
व साघिक जनरल तिसरा क्रमांकाची ट्रॉफी रत्नागिरी जिल्हयाने पाटकावली आहे.
वरील सर्व यसस्वी खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) राज्य संघटनेचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन अध्यक्ष श्री. वेंकटेश्वर राव कररा ( जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार विजेते) उपाध्यक्ष श्री शैलेश गायकवाड (पी आय ) श्री. विश्वदास लोखंडे, सचिव श्री. लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष श्री. शशांक घडशी, संजय सुर्वे व सर्व पदाधिकारी तसेच कै. अन्नपूर्णा प्रभू संगीत कला विद्यालयचे अध्यक्ष अनंतजी आगाशे युवा मार्शल टायकोंडो ट्रेनिंग सेंटरचे सर्व पदाधिकारी पालक, प्रशिक्षक यांनी अभिनंदन केले.
विजेत्या सर्व खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक राम कररा, महिला प्रशिक्षिका सौ. शशी रेखा कररा, सहप्रशिक्षक प्रतीक पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघाचे संघ प्रशिक्षक म्हणून युवा अकॅडमीचे प्रशिक्षक अमित जाधव, महिला प्रशिक्षिका सौ. शशीरेखा कररा यांनी काम पहिले. यशस्वी सर्व खेळाडू व प्रशिक्षक याचे जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
- हे सुद्धा वाचा : Konkan Railway | गणपती स्पेशल गाड्यांचे असे आहे टाईम टेबल!
- मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराला प्रखर विरोध
- Konkan Railway | रेल्वेच्या यूटीएस ॲपवर ऑर्डिनरी श्रेणीतील तिकीटेही मिळू लागली
- कोकण रेल्वेच्या खेड स्थानकावरून कंटेनरद्वारे मालवाहतुकीचा शुभारंभ
