खेड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH 66) खेडमधील जगबुडी नदीच्या पुलावरील काँक्रीट निघाले असल्यामुळे जगबुडी या पुलावरील एका मार्गिकेवरील वाहतूक सध्या बंद ठेवण्यात आली आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी उजव्या बाजूची मार्गिका बंद करण्यात आली असून डाव्या बाजूच्या मार्गीकेवरून महामार्गावरील वाहतूक सुरू आहे. येत्या ३/४ दिवसामध्ये काँक्रीट उखडलेला रस्त्याचा भाग दुरुस्त करण्याचा प्रयत्न आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देण्यात येऊन साईट व्हिजीट करण्यास सांगण्यात आले आहे, खेड तहसीलदारांनी दिली आहे.
