महाराष्ट्र राज्य ज्युनिअर तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा उपविजेता

रत्नागिरी :  ३४ व्या महाराष्ट्र राज्य ज्युनिअर क्युरोगी व 10 वी पूमसे चॅम्पियनशिप बीड 2024 – 25 तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व तायक्वांदो असोसिएशन बीड आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या तीन कन्यांनी सुवर्णभरारी घेत औरंगाबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपलं नाव निश्चित केलं. रत्नागिरी जिल्ह्याने या राज्यस्तरीय स्पर्धेत सांघिक द्वितीय क्रमांक मिळवला.
बीड इथे नुकतच ज्युनिअर क्योरोगी आणि पुमसे चॅम्पियनशिपचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत रत्नागिरीच्या त्रिशा मयेकर, रिया मयेकर आणि तनुश्री नारकर या तीनही मुलींनी सुवर्णपदक मिळवलं. याच स्पर्धेत सार्थक चव्हाण आणि विधी गोरे यांना रौप्य पदक तर समर्थ सकपाळ आणि ओम अपराज यांना कांस्यपदक मिळालं. 42 किलो वजना खालील मुलींच्या स्पर्धेत रिया मयेकर हिला बेस्ट फाइटर म्हणून गौरवण्यात आलं.
याच स्पर्धेत पुमसे या प्रकारात रेगुलर पुमसेमध्ये रिचा संजय मांडवकर कास्यपदक, सई सुवारे हर्षदा मोहिते आणि साधना गमरे यांना सांघिक पुमसेमध्ये कास्यपदक मिळाले.
फ्री स्टाईल पुमसेमध्ये वैष्णवी विजय पाटील सुवर्णपदक तर सई सुवारे आणि अमेय पाटील यांना सांघिक गटात सुवर्णपदक मिळाले.  या संपूर्ण स्पर्धेत रत्नागिरीला सांघिक द्वितीय क्रमांक मिळाला आहे. स्पर्धेसाठी रत्नागिरी मुलांच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून शाहरुख शेख,   साईप्रसाद शिंदे,  यांनी तर मुलींची प्रशिक्षक म्हणून श्रुतिका मांडवकर आणि  पूमसे प्रशिक्षक म्हणून तेजकुमार लोखंडे यांनी काम बघितलं.
विजेत्या खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महा सचिव मिलिंद पाठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, धुलीचंद मेश्राम. उपाध्यक्ष, खजिनदार व्यंकटेश्वर राव करा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण करा कोषाध्यक्ष शशांक घडशी उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन, तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे सर्व पदाधिकारी तसंच सर्व पालक वर्ग यांनी अभिनंदन करत राष्ट्रीय स्पर्धेसाठी विजेत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE