फ्रेंड्स सर्कल लांजातर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन

लांजा : लांजा येथे श्रावण मास निमित्त फ्रेंड्स सर्कल, लांजा तर्फे मंगळागौर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळागौरी निमित्त खास फ्रेंड्स सर्कल, लांजा आयोजित मंगळागौर स्पर्धा 2024 ही लांजा तालुका मर्यादित होणार आहे.
‘महिलांच्या आनंदाचा एक दिवस’ या टायटलखाली ही स्पर्धा दि. शनिवार 24 ऑगस्ट 2024 आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम नोंदणी करणाऱ्या 15 संघानाच प्रवेश नोंदणी दि. 17 ऑगस्ट पर्यंत करता येणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 500 रूपये इतकी आहे.
सादरीकरणासाठी वेळ आठ ते दहा मिनिटे असेल. स्पर्धेसाठी संघ हा आठ ते दहा जणींचा असावा. स्पर्धकांना भरघोस बक्षीसे देणार आहेत.

या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संघांनी सौ.अर्चना पेणकर 8668658476, सौ .साक्षी मानकर 8600228121, सौ .पूजा देसाई, 7387328787 या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE