बिबट्यांकडून होणारे नुकसान टाळण्यासाठी लांजा तालुक्यात लावले ‘ट्रॅप कॅमेरे’

कुवे वाडगावसह वेरवलीत बसवले कॅमेरे

लांजा : लांजा तालुक्यात बिबट्यांकडून होणारे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाकडून कुवें, वाडगाव, वेरवली या गावात बिबट्यांच्या संचारावर लक्ष ठेवण्यासाठी ‘ट्रॅप कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत.
दरम्यान, बिबट्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान याची नुकसान भरपाई देण्याचा अहवाल वरिष्ठांकडे देण्यात आला आहे.

लांजा तालुक्यात गेल्या काही वर्षात बिबट्यांचे संख्या वाढली आहे. वन विभागाची जागृती आणि जंगल भाग झाडी वाढल्याने आणि फासकी लावून जंगली प् प्राण्यांची शिकार करण्याचे प्रमाण कमी झाल्याने बिबट्यांच्या वाढ झाली आहे. अनेक बिबटे भक्ष्य शोधण्यासाठी नागरी वस्तीकडे येऊ लागले आहेत. कुत्री मांजरे त्यांच्यावर हल्ले वाढले आहेत. पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहे.

या पार्श्वभूमीवर वन विभाग सतर्क झाला असून नागरिकांच्या मागणीनुसार काही ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे वाडगाव येथे लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये बिबट्यांची कोणतीही हालचाल दिसून आली नाही. वेरवली गावातही कॅमेर्‍यांमध्ये हालचाल दिसली नाही. कुवे गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आपल्या बछड्यांसह फिरत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या तक्रारीनुसार वन विभागाने आज या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. खेरवसे येथील शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याचा अहवाल देण्यात आला आहे.

तालुक्यातील वाडगाव येथे एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या घराशेजारी येत असल्याचे दिसून येत आहे. शिरवली येथील गवा रेडे यांच्या मुक्त संचारामुळे वनविभाग सतर्क झाला आहे. गतवर्षी झालेल्या नुकसानाची पाहणी करून वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE