रत्नागिरी : उद्यापासून सुरू होणाऱ्याऑगस्ट महिन्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाच्या भरतीमुळे नागरिक तसेच मच्छीमारांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सागरी मंडळाकडून उधाणाच्या भरतीच्या कालावधीत नागरिकांनी समुद्रकिनाऱ्यावर सतर्कता बाळगावी यासाठी ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात समुद्राला येणाऱ्या उधाण भरतीच्या वेळा जाहीर केल्या आहेत. उधाणाच्या भरतीच्या कालावधीत किनाऱ्यावरील मच्छीमार नागरिक तसेच पर्यटकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
