यशश्री शिंदे खून ; आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न करणार : रूपाली चाकणकर 

उरण दि ३१ (विठ्ठल ममताबादे ) : यशश्री शिंदे या उरणमधील तरुणीची एका नराधमाने अत्याचार करून क्रूरपणे हत्या केली. या निर्घृण खुनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात आली. अत्याचार करणाऱ्या व यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सर्वच राजकीय पक्ष व विविध संघटना व संस्थांनी उरण पोलीस स्टेशनवर मोर्चाही काढला होता.

या प्रकरणा मुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. या गंभीर समस्येची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली असून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यकक्षा रूपाली चाकणकर यांनी यशश्री शिंदेच्या घरी जाऊन तिच्या आई-वडील व नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

यावेळी यशश्रीच्या आई-वडिलांनी यशश्रीसोबत घडलेली सर्व हकीकत सांगितली व यशश्रीला न्याय देण्याची विनंती केली. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यातील दोषीवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यशश्रीच्या आई वडिलांना दिले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत,उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर,युवा अध्यक्ष समद बोंबले,अमित साहू,संदेश म्हात्रे,दिनेश पाटील, महिला पदाधिकारी शोभा चौगुले, देवकी शिंदे, साधना वाणी, केदारे मॅडम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी शिंदेहिच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. तळ

या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना रूपालीताई चाकणकर म्हणाल्या की ‘आरोपीला जात-पात धर्म पक्ष काहीही नसतो.ती एक विकृती आहे. कोणीही जातीपातीचे राजकारण करू नये.दिवसेंदिवस समाजात अशा विकृती वाढत चालले असून अशा विकृतीचा वेळीच बंदोबस्त झाला पाहिजे. समाजात वाईट कृत्य, वाईट गोष्टी घडू नये यासाठी आता सर्वांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे.

राज्यात महिलांवरील अत्याचार थांबावेत, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पोलीस प्रशासन त्याचे काम योग्यरित्या करीत आहेत.यशश्री शिंदे प्रकरणातील आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल यासाठी मी जातीने लक्ष देईन.
रुपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग.

या प्रसंगी उपस्थित उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी सदर प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व यशश्री शिंदेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर व प्रशासनाकडे केली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE