लांजा शहर समन्वय समितीचे तहसीलदारांना निवेदन
लांजा : लांजा ग्रामीण रुग्णालयाच्यारखडलेल्या कामाबाबत आज लांजा शहर समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार प्रमोद कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.
लांजा ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे कामाची निविदा काढून दोन वर्षे झाली आहेत ठेकेदार नेमण्यात आलेला आहे. परंतु या इमारतीचे अद्याप काम सुरू नसल्याने तालुक्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. या ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता वेळेवर उपचार होत नसल्याने होत असलेली नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन आज लांजा शहर समन्वय समितीचे वतीने लांजा तहसीलदार श्री. प्रमोद कदम यांना निवेदन देऊन या इमारतीचे काम त्वरित सुरू करण्यात यावे अशी विनंती केली.
यावेळी उपस्थिती प्रकाश लांजेकर, प्रसन्न शेट्ये, विठोबा लांजेकर, शौकत नाईक, गफारशेठ मुजावर, दिलीप मुजावर मारुती गुरव, प्रमोद कुरूप, राहुल शिंदे, अकबर नाईक, लवू कांबळे, राजू लांजेकर, हेमंत शेट्ये, शेखर सावंत, गजानन गुरव, नागेश कुरूप, शरीफ नाईक, संजय लांजेकर, तुकाराम आग्रे आदी उपस्थित होते.
