उरण दि ८ (विठ्ठल ममताबादे ) : बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे.
जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे, हिंदूंच्या घरांवर आक्रमणे करणे, हिंदूंची दुकाने लुटणे, हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे-आग लावणे, हिंदु महिलांवर बलात्कार करणे, हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहे. या गोष्टींमुळे तेथील अल्पसंख्यांक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. या संदर्भात बांगलादेशी सैन्यदलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
सोशल मीडीया’च्या माध्यमातून बांगलादेशातील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत, त्यावरून भारत सरकारने वेळीच लक्ष घातले नाही, तर बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी हिंदूंचा मोठ्या प्रमाणात नरसंहार होण्याची शक्यता आहे, असे समितीने म्हटलेले आहे.
या घटनेनंतर धर्मांध जिहादी आतंकवाद्यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्याच्या छुप्या पाठिराख्यांच्या मदतीने हिंसाचार माजवण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय पोलीस यंत्रणा, प्रशासन यांच्यासह समस्त भारतीयांनी सतर्क रहायला हवे. तसेच स्वसंरक्षणासाठी सिद्ध रहाण्याचीही आवश्यकता असल्याचे समितीने म्हटले आहे.
‘
