रत्नागिरीतील गयाळवाडी येथे उभारणार भव्य तेली समाज भवन!

  • राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी स्वखर्चाने दिली तीन गुंठे जमीन

रत्नागिरी : समस्त तेली समाज बांधवांचे रत्नागिरीत आपले हक्काचे समाज भवन असावे, अशी इच्छा होती. ही इच्छा तेली बांधवानी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोलून दाखवली. अनेक गरजवंतांना आपला आधार वाटणारे ना. रवींद्र चव्हाण यांनी  समाज बांधवांची विनंती तत्काळ मान्य करीत तेली समाजभवनासाठी जागा खरेदी करण्यासाठी तब्बल ४० लाख रुपये इतकी सढळ हस्ते आर्थिक मदत केली. ना रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या याच मदतीतून रत्नागिरीतील तेली बांधवांच्या समाजभावनासाठी गयाळवाडी येथे तीन गुंठे जमीन खरेदी करण्यात आली आहे. या जागेत लवकरच भव्य असे तेली समाज भवन उभारले जाणार आहे.

रत्नागिरीतील तेली समाज बांधवांनी ना. रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली त्याप्रसंगीचे संग्रहित छायाचित्र.

रत्नागिरीतील तेली समाज बांधवांच्या समाज भवन उभारण्यासंदर्भात केलेल्या विनंतीनुसार ना. चव्हाण साहेबांनी कोणताही शासकीय भूखंड उपलब्ध न करता स्वखर्चाने खासगी जागा खरेदी करण्यासाठी ४० लाख रुपये एवढी मोठी रक्कम दिली. त्यामुळे आज तेली भवनासाठी रत्नागिरी गयाळवाडी येथे तेली भवनासाठी ३ गुंठे जागा खरेदी करण्यात आली आहे.

-श्री. संदीप नाचणकर

ना. रवींद्र चव्हाण  यांचे कोकणावर विशेष प्रेम असून त्यांचे दातृत्व अनमोल असल्याचे रत्नागिरीतील तेली समाज बांधवांनी बोलून दाखवले. त्यांनी श्री संताजी जगनाडे महाराज सेवा संस्था रत्नागिरी यांच्या तेली भवनासाठी ४० लाख रुपये रोख दिल्यामुळे आज आम्ही तेली भवन उभारण्यासाठी स्वतःची ३ गुंठे जागा खरेदी करू शकलो. रवींद्र चव्हाण हे राज्याचे कॅबिनेट मंत्री असून त्यांनी सहज कोणताही शासकीय भूखंड देऊ केला असता. परंतु, त्यांनी तसे न करता स्वखर्चाने आम्हाला जागा खरेदी करण्यास मोठी आर्थिक मदत केली. त्यांनी दाखवलेल्या दातृत्वासाठी ना. चव्हाण व भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी संपूर्ण तेली समाज अखंडपणे राहील, अशा शब्दात संदीप तथा बावाशेठ नाचणकर, किशोर पावसकर, शरद कोतवडेकर, प्रभाकर खानविलकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

Pelli Poola Jada

READ MORE