Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी-मडगाव TOD स्पेशल ट्रेन!

रत्नागिरी : स्वातंत्र्य दिन तसेच पाठोपाठ शनिवार-रविवार अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकण रेल्वे मार्गावरील अपेक्षित गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव दरम्यान विशेष फेऱ्या (TOD : Train on demand) चालवल्या जाणार आहेत.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार 01149/01150 या विशेष ट्रेन जाहीर करण्यात आल्या आहेत. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री ९ वाजता दिनांक 15 तसेच 17 ऑगस्ट 2024 रोजी विशेष गाडी सुटेल. ही गाडी मडगावला दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता पोहोचेल.

परतीच्या प्रवासात मडगाव येथून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी 01155 ही गाडी दिनांक 16 व 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता सुटून (दुसऱ्या दिवशीच्या ) रात्री बारा वाजून 40 मिनिटांनी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ला पोहोचेल.

TOD विशेष गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, पेंण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे रोड, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थीवी तसेच करमाळी.

या गाडीला स्लीपर श्रेणीचे आठ तर जनरल श्रेणीतील तीन डब्यांसह वातानुकूलित डबे मिळून एकूण 21 डब्यांची ही एलएचबी प्रकारातील ट्रेन असेल.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE