रत्नागिरी जिल्ह्यात विविध ठिकाणी तिरंगा रॅली

पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत पावसमध्ये तिरंगा रॅली

रत्नागिरी, दि. 10  : हर घर तिरंगा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये आज शालेय विद्याथ्यांची तिरंगा रॅली काढण्यात आली. पावस येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थित तिरंगा रॅली काढण्यात आली.

ढोल, ताशा, लेझिमसह पावस येथे पालकमंत्री श्री. सामंत यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांची रॅली निघाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहूल देसाई, गटविकास अधिकारी जे पी जाधव, तहसीलदार राजाराम म्हात्रे आदी उपस्थित होते.


लांजा तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये शाळा, ग्रामस्थ यांच्या सहभागाने तिरंगा रॅली काढण्यात आली. ढोल, ताशा, झांज आणि देशभक्तीपर नारे देत शालेय विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली.
पंचायत समिती दापोलीमार्फत तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत याची सांगता झाली. प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
खेड येथे मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मंडणगड नगरपंचायतीमार्फतही विविध कार्यक्रम घेण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांची रॅली, सेल्फी पॉईंट, प्रतिज्ञा घेण्यात आली.
चिपळूण नगरपरिषदेमार्फत विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. यात एनसीसी, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE