मुंबई, 15 ऑगस्ट : भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त भाजपा विधान परिषद गटनेते आ. प्रवीण दरेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण आणि भारतमाता पूजन करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नेते मधू चव्हाण, महिला मोर्चा आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, मुख्य प्रवक्ता केशव उपाध्ये, ज्येष्ठ नेते राज पुरोहित, माजी आमदार बाळ माने, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वर्षा भोसले, कार्यालय सहसचिव भरत राऊत आदी उपस्थित होते.
