लांजा : लांजा शहरातील कोत्रेवाडी डम्पिंग ग्राउंड विरोधात आज आज १५ ऑगस्ट रोजी येथील ग्रामस्थ लांजा तहसील कार्याला समोर उपोषणाला बसले आहेत.
या उपोषणाला सर्वच राजकीय पक्ष पदाधिकारी आणि नागरिक यांनी पाठिंबा दिला आहे. नगर पंचायत प्रशासनाने डम्पिंग ग्राउंडबाबत समाधानाकारक भूमिका न घेतल्याने येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कचरा डम्पिंग ग्राउंड प्रकल्प वाडीवस्ती लगत असल्याने हा प्रकल्प रद्द करावा, अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे. नगरपंचायत प्रशासना विरोधात येथील ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. न्यायालयात दावा सुरू असताना या प्रकल्पाची भूसंपादन नगरपंचायतीने केली आहे.
जिल्हा समितीने शिफारस केलेले पत्र आदी विविध शंका निरसन मागणी याची माहिती देण्याची मागणी केली आहे. परंतु नगरपंचायत प्रशासनाने येथील ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर दिलेली नाही. उपोषण मागे घेण्याची विनंती प्रशासनाने केली होती परंतु येथील ग्रामस्थांचे प्रकल्प जबरदस्तीने लादल्याची भावना आहे.
या उपोषणाला मंगेश आंबेकर सतीश पेडणेकर, संतोष कोत्रे, संदीप खामकर, अनिल शिंदे, संजय कोत्रे श्रीधर साळवी राजाराम कोत्रे रामनाथ साळवी सुहास साळवी, शरद शिंदे, अनिल शिर्के, राजेश सुर्वे, मनोज कोत्रे, पांडुरंग साळवी, श्रीकांत साळवी, रमेश चव्हाण अशोक आंबेकर दीपक आडविलकर ,प्रणय साळवी, प्रथमेश शिंदे आदी ग्रामस्थ बसले आहेत. उपोषणाला प्रमोद कुरूप, मोहम्मद रखांगी, अश्रफ रखांगी, नितीन शेटे, राजेश राणे, श्रीकृष्ण हेगिश्ट्ये, धनिता चव्हाण, अनिरुद्ध कांबळे. अनंत आयरे यांनी पाठिंबा दर्शवला आहे.
