रत्नागिरीत 23 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी द्वारा 23 जून 2022 रोजी अधीक्षक
डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे -जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी 415612 येथे दुपारी 12.00 वाजता
डाक अदालत आयोजित केली आहे.
पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल
अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक
वस्तु, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार
अर्ज करावा, तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधिक्षक
डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी 415612 यांच्या नावे दिनांक 17 जून 2022 पर्यंत अथवा तत्पूर्वी

पोहोचेल, अशा बेताने पाठवावी. तद्नंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक
रत्नागिरी विभाग, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE