Double decker Express | अहमदाबाद-मुंबई डबल डेकर एक्सप्रेसचे दोन कोच वेगळे होऊन मागेच राहिले !

मुंबई : अहमदाबाद येथून मुंबईला येणाऱ्या डबल डेकर एक्सप्रेस दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. बडोदा विभागात गोठणगाव यार्डानजीक ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी घडली.

दिनांक 15 ऑगस्ट रोजीची गाडी क्रमांक 12932 अहमदाबाद – मुंबई डबल डेकर एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने धावत असताना. बडोद्या नजीक गोठणगाव खेर्डाच्या जवळपास दोन डबे उर्वरित गाडीपासून वेगळे होऊन मागेच राहिले. डबे जोडणारे कपलिंग सुटल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, मात्र डबे पुन्हा जोडण्याच्या कामासाठी प्रवाशांचा खोळंबा झाला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE