सर्वसामान्य कुटुंबातील करणकुमार झाला  ‘फिजिओथेरपी मास्टर’


डॉ. करणकुमार कररा भौतिकोपचार तज्ञ या विषयात प्रथम तर विद्यापीठामध्ये द्वितीय

चिपळूण :  घरात कोणतीही वैद्यकीय पार्श्वभूमी नसताना अतिशय सर्वसामान्य अशा कुटुंबातील करणकुमार व्यंकटेश कररा यांने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर भौतीकोपाचार तज्ञ म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक्रमात उत्तम यश संपादन केलं आहे. भौतिकोपाचार (फिजिओथेरपी) या विषयात प्रथम तर विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

डॉ. करणकुमार कररा यांनी मास्टर ऑफ फिजिओथेरपीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवाल्याने  कृष्णा विश्वविद्यापीठ कराड येथील भौतिकोपचार महाविद्यालयीन प्रमुख डॉ. वरादराजुळू यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

अलोरे ता. चिपळूण या गावातील सर्वसामान्य कररा कुटुंबातील वेंकटेश्वरराव कररा (वडील) व पद्मलता कररा (आई ) याचा मुलगा करणकुमार. लहानपणापासून अभ्यासू असणाऱ्या करण याला डॉक्टर व्हायचं होत. वैद्यकीय शिक्षणाचा खर्च करण्याइतकी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नसतानाही वडिलांनी पूर्ण पाठिंबा देत मुलाचं स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं. करण याने अलोरे मधील मंदार एज्युकेशन सोसायटी येथे प्राथमिक शिक्षण तर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण येथे पूर्ण केले. त्यानंतर डॉक्टर होण्याचं स्वप्न त्याने बघितल आणि कुटुंबाच्या पाठिंब्याने ते भरघोस यश मिळवत पूर्ण केलं. जवळपास कोणत्याही विद्यापीठामध्ये जागा शिल्लक नसल्याने उच्च शिक्षणासाठी बेंगलोर येथील राजीव गांधी युनिव्हर्सिटी मधील हर्षा इन्स्टिट्यूट ऑफ फिजिथेरपीमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून सहा महिन्याच्या इंटर्नशिपसाठी आदित्य बिर्ला हॉस्पिटल पिंपरी चिंचवड पुणे येथे काम पूर्ण केलं. त्यानंतर फिजिओथेरपी मास्टर होण्याकरिता दोन वर्षाच्या प्रशिक्षणासाठी कराड कृष्णा विश्व विद्यापीठ येथे प्रशिक्षण पूर्ण करून मधुमेह आणि हृदयविकार बायपास सर्जरी या विषयावर रिसर्च करून त्याने प्राविण्य संपादन केले आहे.

मेहनत,चिकाटी आणि परिश्रम यांच्या जोरावर त्याने मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट म्हणून हे सुयश मिळवलं आहे. डॉ.करण कुमार कररा ( मास्टर ऑफ फिजिओथेरपिस्ट ) हे रत्नागिरी जिल्हा तसेच चिपळूण तालुक्यात सेवा देणार आहेत. डॉ.करणकुमार कररा यांनी मास्टर ऑफ फिजिओथेरपीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवाल्याने विद्यालयाचे कृष्णा विश्वविद्यापीठ कराड भौतिकोपचार महाविद्यालयीन प्रमुख डॉक्टर .वरादराजुळू, विभाग प्रमुख, डॉक्टर. पू. विष्णू देवी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE