सामाजिक कार्यकर्त्या शोभा कंकणवाडी यांचे निधन

उरण दि २५ (विठ्ठल ममताबादे ) : पनवेल शहरातील आदई सर्कल जवळ असलेल्या आयप्पा मंदिर समोर राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या व आदर्श गृहिणी शोभा शिवप्पा कंकणवाडी (६७) यांचे दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.

शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक नारायण कंकणवाडी यांच्या त्या आई होत्या. शोभा कंकणवाडी या एक आदर्श गृहिणी व सामाजिक कार्यकर्त्या होत्या. प्रेमळ व मनमिळावू व सर्वांना सोबत घेउन पुढे जाणाऱ्या व गोरगरिबांच्या सुख दुःखात नेहमी धावून जाणाऱ्या म्हणून त्या परिचित होत्या. त्यांच्या मृत्यूने पनवेल शहरात व कंकणवाडी कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात पती,१ मुलगा,३ मुली, ७ नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.

शोभा कंकणवाडी यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात आहे. शिवा संघटना तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनेचे पदाधिकारी सदस्यांनी त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE