पूर परिस्थितीला सामोरे जाण्यास चिपळूण न. प. सज्ज!

चिपळूण नगर परिषदेचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार

चिपळूण : शहराला दरवर्षी पुराचा तडाखा बसतो. गेल्या वर्षीच्या महापुरात चिपळूण पालिका नागरिकांच्या टिकेची धनी ठरली. यावर्षी तशी परिस्थिती होऊ नये, यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालिकेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी दोन महिन्यांपूर्वीच चिपळूण पालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. मदतकार्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनसामुग्रीसह पालिकेत चोवीस तास नियंत्रण कक्ष व नागरिकांना सतर्क करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. दरम्यान, १७ कर्मचाऱ्यांना यांत्रिक बोट चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास आपद्ग्रस्तांना स्थलांतरित करण्यासाठी शहरातील डीबीजे महाविद्यालय, युनायटेड इंग्लिश स्कूल, पेठमाप उर्दू शाळा, प्राथमिक मराठी शाळा, गोवळकोट उर्दू शाळा, खेंड मराठी शाळा, जीवन शिक्षण मराठी शाळा येथे स्थलांतरित केले जाणार आहे. त्याशिवाय शहरातील शासकीय इमारतीही सज्ज करण्यात आल्या आहेत.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE