उत्तराखंडमधील जवानांनी राख्या स्वीकारल्याची छायाचित्रे केली शेअर
लांजा : उत्तराखंड येथील भारतीय सैनिकांनी जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे येथील विद्यार्थिनींनी तयार केलेल्या राख्या स्वीकारल्याचे फोटो शेअर केले आहेत.

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविण्याचा उपक्रम जगन्नाथ गंगाराम पेडणेकर माध्यमिक विद्यालय तळवडे, ता. लांजा, जि. रत्नागिरी येथील विद्यार्थिनींच्या सहकार्याने व प्रशालेतील शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता.
प्रशालेचे मुख्याध्यापक डी. बी. पाटील आणि सहकारी शिक्षक विद्यार्थिनींच्या वतीने हा उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमाचे संस्था अध्यक्ष डॉ. आनंद पेडणेकर यांनी अभिनंदन केले आहे आणि कौतुक केले आहे
