ज्ञानदीप संस्थेचे शिक्षक किशोर नागरगोजे यांची माध्यमिक पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी दापोली येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक किशोर नागरगोजे यांची बिनविरोध निवड झाली आहे. रत्नागिरी येथे रविवारी 31 ऑगस्ट रोजी झालेल्या पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष सागर पाटील व उपस्थित संचालकांनी श्री. नागरगोजे यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दापोली येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक असलेले श्री.नागरगोजे हे गेले 26 वर्ष ज्ञानदानाचे कार्य करत आहेत इंग्रजीवर उत्तम प्रभुत्व असलेले श्री.नागरगोजे हे उत्तम क्रीडा शिक्षकही आहेत. आजवर त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले आहेत. पतसंस्थेच्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेच्या मे 2023 मध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांनी जिल्ह्यात विक्रमी मताने संचालक म्हणून निवडून जाण्याचा मोठा बहुमान मिळाला होता. त्यानंतर त्यांची पतसंस्थेच्या दापोली शाखेचे संचालक म्हणून काम पहिले. या कारकिर्दीत त्यांनी दापोली शाखेचा आर्थिक उलाढालीतील आलेख हा सातत्याने चढता ठेवला आहे.

जिल्हा माध्यमिक पतसंस्थेच्या व्हॉइस चेअरमनपदी निवड झाल्याने श्री.नागरगोजे यांच्या रूपाने दापोलीला तालुक्याला बहुमान मिळाला आहे. या निवडीनंतर ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती. सरोज मेहता,सचिव सुजय मेहता व संचालक मंडळाकडूनही अभिनंदन करण्यात आले आहे. नूतन व्हॉइस चेअरमन किशोर नागरगोजे यांचे शैक्षणिक,सामाजिक, राजकीय अशा विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

तालुका शाखांमध्येही नव्याने निवड जाहीर

रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीच्या मानद सचिव पदी लांजा शाखेच्या शाखा संचालिका सौ. गावडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच एन के वराडकर हायस्कूल मुरुड चे सहाय्यक शिक्षक व दापोलीचे दुसरे संचालक बिपिन मोहिते सर यांची दापोली शाखेच्या शाखा संचालकपदी निवड झाली तसेच खेड शाखेच्या शाखा संचालकपदी बोरघर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. शिंदे तसेच संगमेश्वर शाखेच्या शाखा संचालकपदी श्री.केसरकर तर राजापूर शाखेचा संचालकपदी श्री. वेताळे तसेच रत्नागिरी शाखेच्या शाखा संचालकपदी श्रीमती तांबोळी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष सागर पाटील नूतन उपाध्यक्ष किशोर नागरगोजे व संचालक मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आले आहेत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE