दापोलीतील मुरुडमधील येथील कथित रिसॉर्ट प्रकरण

दापोली : शिवसेनेचे नेते रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ईडीचं समन्स धाडण्यात आलं आहे. दापोली रिसॉर्ट प्रकरणात ईडीने त्यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानावर ईडीने मागच्या काही दिवसांत छापा टाकला होता.भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्यावर मनी लॉड्रिंगचा आरोप करत काही पुरावे ईडी कार्यालयात दाखल केले होते. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानावर आणि त्यांच्याशी संबंधित काही लोकांच्या घरी ईडीने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता परब यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
