लांजा : तळवडे ग्रामपंचायतीने गुरुवारी गणपती विसर्जन वेळी तळवडे येथील नदी काठावर विसर्जन घाटावर निर्माल्य संकलनासाठी स्तुत्य उपक्रम राबविला.
निर्माल्य नदीपात्रात सोडून नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये, यासाठी तळवडे ग्रामपंचायतीने तळवडे येथे सर्व विसर्जन घाटावर निर्माल्य संकलनासाठी कुंड्या ठेवल्या होत्या. यामध्य गणेश भक्तांनी गणेश मूर्ती सोबत आणलेले हार, फुले फुलारा या कुंडीत एकत्रित केला.
सरपंच सौ. रोहिणी आंबेकर, उपसरपंच प्रसाद ढेपे आणि ग्रामसेवक श्री पालये आणि सर्व सदस्य यांचे या उपक्रम राबविल्याबाबत कौतुक होत आहे. संस्कार प्रतिष्ठानने या उपक्रम चे कौतुक केलं आहे.
