रत्नागिरीमध्ये ईद ए मिलाद उत्साहात साजरी


रत्नागिरी : इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस ईद ए मिलाद म्हणून साजरा केला जातो. ईद ए मिलाद चे औचित्य साधून दावते इस्लामी रत्नागिरी शाखेतर्फे जुलूस रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही जुलूस रॅली अतिशय शिस्तबद्ध पद्धतीपणे काढण्यात आली. या वेळी दुचाकी,चारचाकी वाहने, सहभागी झाले होते. ही रॅली उद्यमनगर, कोंकण नगर मारुती मंदिर ते उद्यमनगरमार्गे जाऊन कोकणनगर येथे तिचा शेवट करण्यात आला. जुलूसमध्ये दावते इस्लामी शाखा रत्नागिरी चे सदस्य, उवेज जरीवाला, अली असगर अत्तारी तसेच इतर सर्व सदस्य उपस्थित होते. नंतर सर्वांना नियाजचे वाटप करण्यात आले. रॅली सुरळीत पार पाडण्यासाठी रत्नागिरी शहर पोलिसांनी विशेष मेहनत घेतली.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE