केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशानभूमीचे काम निकृष्ट दर्जाचे

  • काम थांबवून  ठेकेदारावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची  मागणी

उरण दि १८ (विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील केगाव ग्रामपंचायत हद्दीतील स्मशान भूमीचे काम अंत्यत निकृष्ट दर्जाचे असल्याने या स्मशानभूमीचे काम थांबवावे व ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. स्मशानभूमीचे काम करताना कोणतेही योग्य ते नियोजन नाही. तसेच योग्य ते मटेरियल वापरले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी  केली आहे.

स्मशान भूमीचे काम चालू होते. मात्र काम चालू असताना कॉलम चा प्रॉब्लेम झाला आहे. काम अधिक चांगले व व्यवस्थित होण्यासाठी सदर स्मशान भूमीचे काम थांबविले आहे. सदर कामाची पाहणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. पाहणी केल्या नंतर सदरचे काम थांबविण्यात आले आहे.तसे सूचना ठेकेदारलाही देण्यात आले आहेत.

राम म्हात्रे, ग्रामविकास अधिकारी, केगाव ग्रामपंचायत

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE