धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशासाठी आरपीएफ महिला कॉन्स्टेबल ठरली देवदूत!

उडपी ( कर्नाटक) : रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवशीच कोकण रेल्वे मार्गावर उडपी रेल्वे स्थानकावर चालत्या ट्रेनखाली जाणाऱ्या प्रवाशाचे प्राण वाचविण्याची धाडसी कामगिरी रेल्वे पोलिस अपर्णा के. टी यांनी आज केली आहे.

कोकण रेल्वेच्य धाडसी रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल अपर्णा यांना तातडीनं ५००० रूपये देउन कोकण रेल्वेकडून सन्मानित करण्यात आले आहे. मंगलोर ते मडगाव 06602 ही ट्रेन आज सकाळी उडपी स्टेशनरून मडगावला निघत असताना एक प्रवासी ट्रेन पकडायला जात असताना अचानक प्लॅटफॉर्म वरून पाय घसरून या ट्रेन खाली जात असल्याचं कार्यरत आरपीअफ अपर्णा यांनी पाहिले. त्यानी प्रसंगावधान राखून त्या प्रवाशाला धावत जाऊन बाहेर काढले आणि अपघातापासुन वाचविले.

आज रेल्वे सुरक्षा बल स्थापना दिवस आहे. रेल्वे पोलिस रात्र दिवस प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सदैव तत्पर असतात. कोकण रेल्वेच्या रेल्वे पोलिस दलातील कर्मचाऱ्यांनी अनेकवेळा धाडसी कामगिरी बजावली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE