वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ रवाना

रत्नागिरी : लातूर येथे होणाऱ्या वरिष्ठ तायक्वांदो स्पर्धेसाठी रत्नागिरीचा युवा संघ रवाना झाला आहे. दिनांक २८ ते ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन ऑलिंपिक असोसिएशन यांच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्यावतीने लातूर तायक्वांदो असोसिएशन यांच्या सहकार्याने दि. 28 29, 30 सप्टेंबर 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल लातूर येथे 34 वी महाराष्ट्र राज्य महिला व पुरुष वरिष्ठ तायक्वांदो क्युरोगी फुमसे स्पर्धा स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.

या स्पर्धेत रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन ला संलग्न असलेले अधिकृत तायक्वांदो क्लब युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर शाखा ओम साई मित्र मंडळ साळवी स्टॉप नाचणे लिंक रोड मराठी शाळेजवळ येथील प्रशिक्षण वर्गातील चार महिला व तीन पुरुष असे एकूण सात वरिष्ठ खेळाडूंची निवड झाली असून आज रोजी चिपळूण लातूरसाठी संघ रवाना होत आहे.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे सौ. शशी रेखा राम कररा, तन्वी तुषार साळुंखे, श्री. अमित रेवत कुमार जाधव, प्रतीक राजेंद्र पवार, मयुरी मिलिंद कदम, नेहा राजेंद्र पवार तसेच कार्तिक किसन साबळे.

या यशस्वी खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री व्यंकटेश्वरराव कररा ( जिल्हा क्रीडा संघटक पुरस्कार प्राप्त) सचिव श्री लक्ष्मण कररा, उपाध्यक्ष श्री. विश्वदास लोखंडे, खजिनदार श्री शशांक घडशी संजयजी सुर्वे यांनी अभिनंदन केले यशस्वी सर्व वरिष्ठ खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षक श्री .राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

READ MORE