देवरूख : पिरंदवणे गावातील गेली चार वर्षे बंद असलेली लालपरी पिरंदवणे सरपंच आणि शिवसेना उपविभाग प्रमुख विश्वास घेवडे व युवासेना उपतालुका प्रमुख सुधीर चाळके यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु करण्यात आली आहे.
संगमेश्वर बस स्थानकातून सकाळी ९.४० वाजता पिरंदवणे साठी नियमित गाडी सुटत असे. परंतु कोरोना महामारी काळात ही गाडी बंद करण्यात आली होती.
कोरोनानंतर ही गाडी सुरू नसलल्याने प्रवाश्यांची गैरसोय होत होती. ही बाब शिवसेनेच्या सुधीर चाळके व सरपंच विश्वास घेवडे यांच्या निदर्शनास येताच देवरुख आगार व्यवस्थापक यांना निवेदन दिले व सतत त्याचा पाठपुरावा केला. त्याला यश येवून सदरची पिरंदवणे बस (लाल परी) पुन्हा पिरंदवणे वासियांच्या सेवेस आज रोजी चालू झाली.
सुधीर चाळके व विश्वास घेवडे यांनी देवरूख आगार व्यवस्थापकांचे आभार मानले.
