पद्मश्री डॉ. शरद काळे ७ ऑक्टोबर रोजी साधणार रत्नागिरीकरांशी संवाद!

  • शास्त्रज्ञ आपल्या भेटीला’अंतर्गत ‘विज्ञान दृष्टी-विज्ञान संस्कार पर्यावरण आणि निसर्ग ऋण’ या विषयावर मांडणार विचार

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या मनावर विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्तीनंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे रत्नागिरीत येत आहेत. सोमवारी (७ ऑक्टोबर) हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह, व्यंकटेश एक्झिक्युटिव्ह, मारुती मंदिर, येथे सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात ते जनसामान्यांसाठी ‘विज्ञान दृष्टी-विज्ञान संस्कार पर्यावरण आणि निसर्ग ऋण’ या विषयावर आपले विचार मांडणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून आसन क्षमता मर्यादित असल्यामुळे वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन येथील विज्ञानप्रेमी मंचातर्फे करण्यात आले आहे.

सध्याच्या बदलत्या काळात विद्यार्थ्यांच्या मनावर बदलत्या परिस्थिती नुसार काही संस्कार होणे महत्त्वाचे आहे त्यातीलच एक म्हणजे विज्ञान संस्कार. शालेय जीवनक्रमात ३०-३५ मिनिटांच्या तासिकेमध्ये विज्ञान समजणे व त्यावर विचार होणे हे दुरापस्त होत आहे. विद्यार्थ्यांच्या मनावर  विज्ञान सृजनाचा संस्कार व्हावा व त्यानी स्वतः विज्ञान अभ्यासावे या उद्देशाने निवृत्ती नंतरचे आयुष्य विज्ञान संवादात, प्रसारात घालवणारे विज्ञानव्रती ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर शरद काळे रत्नागिरीत येत आहेत. ग्रंथाली प्रकाशनसोबत या उपक्रमाची सुरुवात त्यानी “विज्ञान धारा” या व्यासपीठवरून २०२२ पासून केली आहे.


रत्नागिरी तसेच राजापूर व आडिवरे येथील शाळांना भेट देऊन तेथील विद्यार्थी व शिक्षकांशी ते मुक्त संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून रत्नागिरी येथे ७ ऑक्टोबर रोजी ते रत्नागिरीकरांसमोर आपले विचार मांडणार आहेत. डॉ.शरद काळे हे भाभा अणुसंशोधन केंद्रातून निवृत्त झाले आहेत. जैवविघटनशील कचऱ्यावर प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीचे तंत्रज्ञान त्यानी विकसित केले असून भारतभर हे तंत्रज्ञान अनेक संस्था उपयोगात आणत आहेत.


हा कार्यक्रम सर्वांसाठी विनाशुल्क असून आसन क्षमता मर्यादित असल्यामुळे वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन रत्नागिरी येथील विज्ञानप्रेमी मंच, रत्नागिरी यांनी केले आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE