उरण दि ११ (विठ्ठल ममताबादे ) : शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या कै. गो. ना. अक्षीकर विद्या संकुलातील जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट इंग्लिश मीडियम स्कूल उरण प्री प्रायमरी आणि प्रायमरी यांच्यातर्फे शाळेमध्ये सरस्वती पूजा साजरी करण्यात आली.

यावेळी शाळेचे स्कूल कमिटीचे चेअरमन सदानंद गायकवाड, माजी उपसभापती वैशाली पाटील, सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील,संकुलातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते.शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमासाठी विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
