सावंतवाडी-पनवेल स्पेशल १२ रोजी धावणार
रत्नागिरी : कोकण मार्गावर मध्य रेल्वेने दिवाळी हंगामासाठी चालवण्यात आलेली सावंतवाडी-पनवेल दिवाळी स्पेशल १२ नोव्हेंबरला देखिल धावणार आहे. कोकणातून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांची कन्फर्म तिकीटे मिळणे अवघड असताना या गाडीला मात्र शेकडे तिकडे उपलब्ध आहेत.

परतीच्या प्रवासात ती १३ नोव्हेंबर रोजी धावेल. ०११७८/०११७७ क्रमांकाची सावंतवाडी-पनवेल साप्ताहिक स्पेशल सावंतवाडी येथून रात्री ११.२५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.४० वाजता पनवेल येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात पनवेल येथून सकाळी ९.४० वाजता सुटून त्याच रात्री ८ वाजून ५ मिनिटांनी सावंतवाडी येथे पोहोचेल. २० एलएचबी डब्यांची स्पेशल कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, रोहा स्थानकात थांबेल.
