रत्नागिरी जिल्ह्यात इलेक्शन ड्युटीसाठी धावणार २६० एसटी बसेस!

रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रांवर मतदानयंत्रे पोहोचवण्यासाठी आणि मतदानानंतर ती मतमोजणी केंद्रांवर ते परत नेण्यासाठी राज्यभरात ८,९८७ एसटी गाड्यांची मागणी केली होती. त्यानुसार जिल्हयासाठीही राज्य परिवहन महामंडळाने २६० एसटी उपलब्ध करून देण्याची व्यवस्था ठेवली आहे.

या गाड्या १९ व २० नोव्हेंबर रोजी प्रासंगिक करारावर देण्यात येणार आहेत. या कालावधीत निवडणूक साहित्य व मतदान यंत्रांची  वाहतूक करण्याचे महत्त्वपूर्ण काम या बसद्वारे केले जाणार आहे. शिवाय २४५ अतिरिक्त बसेस प्रशासनासाठीही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. एसटीकडे सध्या स्वतःच्या एकूण १३,३६७ बस आहेत. त्यांपैकी ९,२३२ बस राज्यातील विविध ३१ विभागांतून निवडणुकीच्या कामासाठी तैनात केल्या जातील. मुंबईसह संपूर्ण राज्यात यासाठी व्यवस्थापन केले जाणार आहे.

प्रवासी वाहतुकीवर परिणाम नाही

प्रशासनाच्या बसची माहितीनुसार, मागणी ठराविक कालावधीसाठी आहे. त्यामुळे या प्रासंगिक कराराचा नियमित प्रवासी वाहतुकीवर परिणाम होणार नाही. त्यामुळे रोजच्या प्रवाशांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, याची दक्षता एसटी प्रशासनाने घेतली आहे.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE