उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक भरारी पथकाकडून तपासणी

जयगडच्या जेएसडब्ल्यू हेलिपॅडवर झाली तपासणी


रत्नागिरी : जयगड येथील जे एस डब्ल्यू हेलिपॅडवर महायुतीचे उमेदवार आणि शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरची निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने तपासणी केली.

महायुतीचे रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरच्या तपासणीदरम्यान, विद्यमान मंत्री असलेल्या उदय सामंत यांनी निवडणूक आयोगाच्या सर्व नियमांचे पालन करण्याची तयारी दर्शवली. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करत तपासणी करण्यास सांगितले.

निवडणूक एक लोकशाहीचा सण आहे. या सणाला यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकाला आपली जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. निवडणूक आयोगाचे सर्व नियम पाळूनच निवडणूक लढली पाहिजे.

-उदय सामंत, उमेदवार, महायुती, रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ.

निवडणूक आयोगाच्या या तपासणीमुळे निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणूक होण्यासाठी वातावरण निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE

best news portal development company in india

READ MORE