मुंबई विद्यापीठाच्या स्पर्धेत गोगटे-जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीचा पुरुष फुटबॉल संघ उपविजेता

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त), रत्नागिरीच्या पुरुष फुटबॉल संघाने  मुंबई विद्यापीठ कोंकण झोन पुरुष फुटबॉल -२०२४-२५ स्पर्धेचे उपविजेतपद व रौप्य पदक पटकावले आहे.

मुंबई विद्यापीठ, मुंबई व कोंकण झोन आणि एस. एच केळकर आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ ते १५ नोहेंबर २०२४ रोजी कोंकण झोन पुरुष फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी च्या पुरुष फुटबॉल संघाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५  कोंकण झोन पुरुष फुटबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद व रौप्य पदक पटकावले.

या स्पर्धेत  पुरुष फुटबॉल संघात १) तुषार कांबळे  २) आर्यन जाधव  ३) अनुज पुजारी  ४) निखिल खेत्री  ५) विवेक बेद्रे ६) आयान बावडे  ७) भूषण जाधव ८) आश्रय शिंदे  ९) आयुष वेलणकर १०) अथर्व म्हस्के ११)  मानोजसिंग पुरोहित १२) मयुरेश पिलणकर १३) विशाल परीहार १४) गुरुप्रसाद  कोतवडेकर. या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व केले होते. 

मुंबई विद्यापीठ वेटलिफ्टींग स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त झालेल्या कु. पार्थ जाधव या विद्यार्थ्याचे रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीश शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर  संस्थेचे सर्व सदस्य, तसेच  गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे, क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके सर्व प्राध्यापक सहकारी, कर्मचारी, सेवक यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Digi Kokan
Author: Digi Kokan

Leave a Comment

READ MORE